Site under maintainance
Site under maintainance
Site under maintainance
 
       
 
New Marathi Movie : Gabhricha Paus - The Damned Rain | Official Marathi Website
 
 THE DAMNED RAIN

   

SocialTwist Tell-a-Friend

  • कलाकार : सोनाली कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, ज्योती सुभाष, वीना जामकर, अमन अत्तर, मुकुंद वसुले
  • लेखक दिग्दर्शक : सतीश मन्वर
  • सिनेमटॉग्राफी : सुधीर पळसने
  • एडीटर : सुचित्रा साठे
  • साउंड डिझाईन : अनमोल भावे

  • संगीत : दत्तप्रसाद रानडे
  • गीत : दासू
  • पार्श्वसंगीत : मंगेश धाकडे
  • कार्यकारी निर्मात : नितीन प्रकाश वैद्य
  • निर्माता : प्रशांत मधुसुदन पेठे
 

महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागाचं स्वत:च असं खास वैशिष्ट्य आहे आणि त्यासाठी तो भाग प्रसिद्ध असतो. तसंच विदर्भातला काही भाग (कु)प्रसिध्द आहे तिथे होणा-या शेतक-यांच्या आत्महत्यांमुळे! गाभ्रीचा पाऊस हा चित्रपट नेमका आधारला आहे याच विषयावर...

दोन लहान मुलं गावात भटकत आहेत अशा दृश्याने चित्रपटाची सुरूवात  होते. त्यातला एक आहे सायकलवर आणि दुसरा सायकलवर बसायला मिळावं या आशेने त्याच्यामागे पळतोय! पळता पळता ते एका झाडापाशी येऊन थबकतात. सहजच इकडे-तिकडे पहाता त्यांना त्याच झाडावर एक माणूस गळफ़ास लावून लटकलेला दिसतो आणि चित्रपट त्याच क्षणाला विषयाला हात घालतो...

चित्रपटात यानंतर आपल्याला एका कुटुंबाची ओळख होते! या कुटुंबाच्या कर्त्या पुरूषाची, किस्नाची, भूमिका साकार केली आहे गिरीश कुलकर्णी यांनी आणि त्याच्या पत्नीचं, अल्काचं, काम केलय सोनाली कुलकर्णीन! या कुटूंबात एक आजी, किस्नाची आई पूर्णा (ज्योती सुभाष) असून ती कुटूंबातली सर्वात समजुतदार व्यक्ती आहे. किस्ना आणि अल्काला सहा वर्षाचा छोटा मुलगा दिनूही आहे. दिनू हा निरागस असला तरी अतिशय हुशार असून तो आपल्या आईशी प्रामाणिक आहे!

गावात घडणा-या एकूणच आत्महत्या आणि त्याची कारणं लक्षात घेता अल्कालाही आपला नवरा आत्महत्या करेल की काय अशी भिती असते. पण किस्नाला त्याच्याकडे या नजरेनं पाहिलं जातय याची कल्पनाही नसते. अल्का तिच्या सासूला ही भिती बोलून दाखवते आणि दिनूच्या मदतीने, त्याची इच्छा आणि समज नसतानाही, आपल्या नव-यावर सतत नजर ठेवायचा प्रयत्न करते...

अशा एकंदरीत धरतीवर हा चित्रपट आधारला असून पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पहावा लागेल! सध्या पाहूया त्याची एक झलक...

 
 
Share
हल्लीच्या तद्दन विनोदी चित्रपटांपेक्षा हा चित्रपट एक वेगळा आणि शेतक-यांच्या आत्महत्येसारखा महत्वाचा विषय घेऊन लोकांपुढे येतो आणि तो तितक्याच परिणामकारक पद्धतीने लोकांपुढे मांडतो हेच या चित्रपटाचं मुख्य वैशिष्ट्य! ...असं असलं तरी या चित्रपटात बरेचसे हलकेफुलके क्षणही आहेत जे चित्रपटाचे रंग आणखी खुलवतात! सगळ्याच अभिनेत्यांचा भूमिका त्यांनी खूप ताकदीने चित्रपटात साकारल्या आहेत.

या चित्रपटाला लाभलेलं संगीत हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल! गाण्यांचे शब्द फ़ार सुंदर लिहिले असून ते शेतक-यांची सद्यस्थिती फ़ार परिणामकारक पद्धतीने मांडतात! गावरान बाजाचं संगीत या निमित्ताने आपल्या खूप दिवसांनी ऐकायला मिळतं. या चित्रपटाचं एडीटींगही खूप अप्रतिम झालय त्यामुळे कुठलाही सीन लांबलेला किंवा कंटाळवाणा वाटत नाही.

रोटरडॅम, नेदरलॅंड इथे प्रिमियर झालेल्या या चित्रपटाला आत्तापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलयं. त्यात खालील पुरस्कारांचा समावेश आहे!

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट : BMM Convention, Philadephia
  • पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल मध्ये सर्वोत्कृष्ट आतंरराष्ट्रीय चित्रपटासाठीचा महाराष्ट्र शासनातर्फे संत तुकाराम पुरस्कार
  • स्पेशल ज्युरी पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे

चित्रपटातील गाणी..
 

  • हबर्ट बाल्स फ़ंड : रोटरडॅम इथे झालेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल मध्ये, वितरणासाठी दिला जाणारा पुरस्कार ( १०,००,००० रु. ). जगातल्या ३७७ चित्रपटांपैकी केवळ ३१ चित्रपटांना हा निधी देण्यात आला आहे! हा पुरस्कार मिळवणारा हा भारतातला पहिला चित्रपट आहे,
  • व्ही. शांताराम पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट बालकलाकार, सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन, सर्वोत्कृष्ट एडिटींग

या व्यतिरीक्त खालील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हल्ससाठी या चित्रपटाची ऑफिशियली निवड झाली आहे.

  • कैरो ईंटरनॅशनल फ़िल्म फ़ेस्टीव्हल, ईजिप्त.
  • वॉरसॉ इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल, पोलंड
  • इंडियन फिल्म फेस्टीव्हल, लॉस एन्जलिस
  • डर्बन इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल, साउथ अफ़्रीका
  • वॅनकुवेर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल, कॅनडा
  • ट्रानिलविनीया इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल, रोमानिया
  • अहमदाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल,
  • Bollywood & Beyond, Germeny
  चित्रपटाविषयी अधिक माहिती /  संबंधीत बातम्या

 

* आपले अभिप्राय हे फक्त ह्या पानाशी/त्यावरील माहितीशी संबंधित असावेत. अन्य अभिप्राय लिहिण्यास येथे टिचकी मारा.
*  लॉगिन न करताही अभिप्राय लिहिणे शक्य आहे तरीही सहसा लॉगिन करूनच अभिप्राय लिहावेत. जेणेकरून गरज पडल्यास तुमचा अभिप्राय डिलीट करण्याची सोयही तुम्हाला वापरता येईल.लॉगिन करण्यास येथे टिचकी मारा.
*  गूगल च्या पद्धतीने मराठीत टाईप करण्यास येथे टिचकी मार
नाव :
ई-मेल :
अभिप्राय :  
[ एखादा शब्द अडतोय? किबोर्ड पहा ]
  मराठीत लिहा (F12 - मराठी-इंग्रजीत बदलण्यासाठी)
 Remaining Characters : 1024
[ मानांकन देण्यासाठी ता-यांवर टिचकी मारा ]  
 
मानांकनानुसार सर्वोत्कृष्ट  आणि नुकतेच आलेले अभिप्राय    [ सर्व अभिप्राय पहा ]
  santosh gaikwad  |  
  atishay sunder
[ Oct 24, 2009 7:21 AM ]

  damji patel  |  
  आपण हा सिनेमा जरुर पहावा जगात कोणत्या प्रकारे लोक आपले आयुष्य जगतात हे प्रत्येकाला समजण्यासाठि आपण हा सिनेमा जरुर पहावा
[ Aug 9, 2009 8:47 AM ]

  prakash pawar  |  
  आपण हा सिनेमा जरुर पहावा जगात कोणत्या प्रकारे लोक आपले आयुष्य जगतात हे प्रत्येकाला समजण्यासाठि आपण हा सिनेमा जरुर पहावा
[ Aug 9, 2009 2:04 AM ]

  sharad   |  
  मला हा सिनेमा खुप आवडला.तुम्हीही बघा तुम्हाला पण खूप आवडल. अप्रतिम...
[ Aug 3, 2009 4:37 AM ]

  PRASAD ACHREKAR  |  
  मला हा सिनेमा खुप आवडला.
[ Aug 3, 2009 3:10 AM ]

 

.. अन्य पहाण्यासारखं काही!


नवीन मराठी अल्बम्स


कलाकार


नाटक


 

Advertisement

 
 

अभिप्राय लिहा । संपर्क  । अटी आणि शर्ती । मानबिंदू टीम परिचय | साईटमॅप

Connect with us on :  Facebook | Orkut | Twitter | Youtube

@ Maanbindu All Rights Reserved ,2008. Site best viewed in Microsoft Internet Explorer
@ Copyright : No Content can be re-produced on any other website without prior permission  Protected by Copyscape Online Copyright Checker

 

Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Maanbinduchya Orkut community var kay chalalay !! Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..