SMS
Maanbindu jaiho
to 5676775 to receive updates about the event
सहभागी गायक:
ए. आर. रेहमान, हरीहरन,
जावेद अली, राशीद अली, राजा हसन, बेनी दयाळ,
मोहम्मद असलम,
रुपकुमार राठोड आणि अन्य
सहभागी गायिका:
राधा मंगेशकर,
चित्रा, साधना सरगम, सुझॅन, विवियन चैक्स, निती
मोहन, सायोनारा, रैहाना, तन्व
आणि अन्यी
सहभागी वादक :
नवीन (बासरी), केथ पीटर्स, संजीव, राशीद अली (
गिटार), असद (सितार)
आणि अन्य
३१ मे रोजी
झालेल्या
या कॉन्सर्टच्या निमित्ताने ८ मे रोजी MIT collage
campus मध्ये एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती.
खुद्द ए. आर. रेहमान तिथे येणार असल्याची खबर त्याच्या
चाहत्यांना आधीच मिळाल्याने सुमारे ३००० हून अधिक
चाहत्यांनी तिथे एकच गर्दी केली होती आणि पत्रकार
परिषदऐवजी त्या जागेला मिनी - कॉन्सर्टचं रूप आलं होतं!!
या प्रसंगी रेहमानने जय-हो वर्ल्ड टूरचा खास झेंडा
हवेत फ़डकवला आणि त्याच्या या कॉन्सर्टबद्दल अधिक माहिती
सुद्धा दिली! त्याच्या चाहत्यांनी उत्साहाने केलेलं
त्याचं स्वागत पाहून त्यालाही भरून आलं होतं, तो
म्हणाला, "तुमच्या
सारख्या चाहत्यांचा पाठींबा आणि देवाने दिलेले
आशीर्वाद या मुळेच मला सतत नवीन करण्याची प्रेरणा मिळते.
पुणे हे शहर भारतरत्न लता मंगेशकर आणि भारतरत्न पं.
भिमसेन जोशी यांच्या घरासारखं आहे आणि यामुळे या वर्ड
टूर चा पहिला लाईव्ह शो पुण्यामध्ये करताना मला विशेष
आनंद होतोय! "
हा कॉन्सर्ट हा रेहमनाच्या जय हो या वर्ल्ड टूरचा एक भाग
असून या कॉन्सर्ट्च्या निमित्ताने ऑस्कर
जिकंल्यानंतर रेहमान प्रथमच लोकांसमोर
आला होता. सुमारे ६० हून अधिक
दिग्गज कलांवत या कार्यक्रमात सहभागी
झाले. न भूतो न भविष्यती अशा
रंगलेल्या या सोहळ्यासाठी साधारणत: ५ ते ७ हजाराहून
जास्त चाहते यावेळेस बालेवाडी स्टेडियमवर जमले होते. या
शोसाठी उभारण्यात आलेला रंगमंच तर डोळ्याचे अक्षरश: पारणे
फ़ेडणारा होता. साधारणत: ३० ते ४० फ़ूट लांबीची LCD स्क्रीन,
गाण्यांनुसार बदलणारी त्यावर दिसणारी छायाचित्रे आणि
एकंदरीतच प्रकाशयोजना अनुभवताना जवळपास प्रत्येक गाण्याला
एक वेगळा रंगमंच पाहिल्याचा आभास होत होता! ३१ मे रोजी बालेवाडी
स्टेडीयमवर
रंगलेल्या या सोहळ्यात साधारणत: ३५ गाणी सादर केली
गेली. यामधली रोझा चं टायटल ट्रॅक, ऐ
हैरथे नाझनी, पप्पू कान्ट डान्स, जय हो आणि वंदे मातरम या
गाण्यावर चाहत्यांची स्टेडियम अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं.
रंगमंचावरील भारतररत्न लतादीदींची उपस्थिती आणि त्यांनी
जमलेल्या चाहत्यांशी साधलेला संवांद हे या कार्यक्रमाचं
अजून एक वैशिष्ट्य ठरलं. या कार्यक्रमात खालील गाण्यांचा समावेश
होता.
वेलकम स्पीच
मौसम ऍंड एस्केप (स्लमडॉग
मिलीयनर)
ओ साया (स्लमडॉग मिलीयनर)
तन्वी, ए. आर.रेहमान
अथिरडी (सिवाजी) ए. आर. रहमान,
सायोनारा
तु मुस्कुरा (युवराज)
रोजा जानेमन (रोजा) साधना
सरगम, हरीहरन
मसकली (देल्ही ६) राजा हसन
जिया से जिया (कनेक्शन्स) ए
आर रेहमान
ओरू कोडई (सिवजी)
लिक्वीड डान्स (स्लमडॉग
मिलियनर)
गुझारीश (गझनी) जावेद अली
नेत्रु इल्लथा (पुडीया मुघलम)
चित्रा
मलारगले (लव्हबर्ड्स) हरीहरन
कभी कभी (जाने तु) राशीद अली
रेहना तु (देल्ही ६) ए. आर .रेहमान
रिंगा रिंगा (स्लमडॉग मिलियनर)
सायोनारा, निती मोहन
गॅंगस्टा ब्लूझ (स्लमडॉग
मिलियनर)
न्यू (न्यू) - ब्लेझ
ये देल्ही मेरा यार - देल्ही
६
कलाभंडार(देल्ही ६)
असीमंशा शाहशा, रुक्मणी मेडले
लतिकास थीम - सुझॅन
क्वाजा जी (जोधा अकबर) - ए.
आर रेहमान
अर्झियां (देल्ही ६) जावेद
अली,राजा, मोहम्मद असलम, रेहमान)
कन्नलाने (बॉम्बे)
ए हैरथे (गुरू) हरीहरन, ए. आर.
रेहमान, साधना सरगम
वाजी वाजी (सिवजी) हरीहरन,
साधना सरगम
मुस्तफ़ा मुस्तफ़ा ए. आर.
रेहमान
युवा -ए आर रेहमान
पप्पु कान्ट डान्स (जाने तु)
ए बचु सुझॅन
उर्वशी उर्वशी (ए. आर. रेहमान)
टॅक्सी टॅक्सी
अन्था
जय हो (स्लमडॉग मिलियनर)
वंदे मातरम
या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचा
कॅमेरा अथवा कुठल्याही प्रकारचं लाईव्ह रेकॉर्डींग
करण्यास परवानगी नव्हती. तरीही रेहमानच्या चाहत्यांनी
आपल्या मोबाईलद्वारे हे
अविस्मरणीत क्षण बंदीस्त करून ठेवलेच!
चला पाहूया एक झलक!
या कॉन्सर्ट्च्या माध्यमातून
मिळणारं उत्पन्न हे लता मंगेशकर मेडीकल फ़ाउंडेशन आणि
आळंदी-देहू विकास परीसर समिती यांना मदत म्हणून
देण्यात आलं! लता मंगेशकर मेडीकल फ़ाउंडेशन तर्फ़े
पं. ह्र्द्ययनाथ मंगेशकर
यावेळेस
उपस्थित होते. ते म्हणाले, "
लता मंगेशकर मेडीकल फ़ाउंडेशन तर्फ़े दीनानाथ मंगेशकर
रुग्णालय चालवलं जातं. यंदा पावसाळ्यानंतर याच नावाने
दुसरं हॉस्पिटल सुरू करण्याचा आमचा मानस आहे आणि
रेहमानने यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी घेतलेल्या
पुढाकाराबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे."
@ Maanbindu All Rights Reserved ,2008. Site best viewed in Microsoft Internet Explorer @ Copyright : No Content can be re-produced on any other website without prior permission